ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालयात कंत्राटी डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ५ जागा

मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालयसर ज.जी.समूह रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून आहेत.

डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधारक आणि मराठी-३० श. प्र. मि. आणि इंग्रजी-४० श. प्र. मि. वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण व शासकीय नियमानुसार संगणक अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २९ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज दाखल करण्याचे ठिकाण – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष ज. जी. समूह रुग्णालय, मुंबई येथे उमेदवाराने स्वतः सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२४ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) सादर करता येतील.

मुलाखतीचे ठिकाण – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत तळमजला, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

टेलिग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.