हिंदुस्थान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
उप महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), सहाय्यक व्यवस्थापक (नागरी) आणि अधिकारी (राजभाषा) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३७ वर्षापेक्षा जास्त नसावे.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५९०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) व सहाय्यक व्यवस्थापक (नागरी) पदाकरिता उपमहाव्यवस्थापक (एचआर अँड ए), एचआयएल (इंडिया) लिमिटेड, रसायनी, जिल्हा. रायगड, पिनकोड- ४१०२०७ (महाराष्ट्र) येथे आणि उप महाव्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) पदांकरिता जनरल मॅनेजर (एचआर अँड अडमिन.), एचआयएल (इंडिया) लिमिटेड, एससीओईपी कॉम्प्लेक्स, कोर-६, दुसरा मजला, ७, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३ तसेच अधिकारी (राजभाषा) पदाकरिता एचआयएल (इंडिया) लिमिटेड, ए-४, औद्योगिक ग्रोथ सेंटर, मानसा रोड, बठिंडा (पंजाब), पिनकोड- १५१००१ येथे अर्ज करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.