आरोग्य विभाग परीक्षा : पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा फेरविचार करणार

नुकत्याच पार पडलेल्या आणि पेपरफुटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरोग्य खात्याच्या परीक्षांच्या प्रश्नी फेरविचार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केली.

सध्या कोरोना संसर्गामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे अनुपस्थित आहेत. सोमवारी ते सभागृहात येणार असून त्यावेळी या परीक्षांबाबत चर्चा करून दोषींवर कार्यवाही करण्याबाबत आणि उमेदवारांना पुन्हा परीक्षेची संधी देण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यामुळे सर्वच परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची उमेदवारांची मागणी पुन्हा ऐरणीवर येत आहे.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});