अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदाच्या २००० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग ऑफिसर (नर्सिंग अधिकारी) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

नर्सिंग ऑफिसर (अधिकारी) पदाच्या २००० जागा
भोपाळ येथे ६०० जागा, जोधपूर येथे ६०० जागा, पटना येथे ५०० जागा आणि रायपूर येथे ३०० जागा

शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी.(नर्सिंग)/ बी.एस्सी उत्तीर्णसह भारतीय नर्सिंग परिषदेकडून नर्सिंग मान्यताप्राप्त
संस्था किंवा विद्यापीठ किंवा बी.एस्सी. (पोस्ट सर्टिफिकेट)/ पोस्ट-बेसिक बी.एस्सी. उत्तीर्णसह भारतीय नर्सिंग परिषदेकडून नर्सिंग मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठ आणि राज्य/ भारतीय नर्सिंग परिषदेत नर्स आणि मिडवाइफ म्हणून नोंदणीकृत किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिलकडून सामान्य नर्सिंग मिडविफरी मध्ये पदवी आणि संस्था/ मंडळ किंवा परिषद तसेच राज्य/ भारतीय नर्सिंग परिषदेत नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणीकृत आणि किमान ५० बेड्सच्या हॉस्पिटलमधील दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय २१ वर्षे ते ३० वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२००/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ, जोधपूर, पटना किंवा रायपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});