नाशिक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या १० जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी सविस्तर जाहीरात, अटी व शर्ती शासकिय संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी सदर अटी व शर्तीचे वाचन करुन संकेतस्थळावरुन विहित नमुन्यामधील अर्ज डाऊनलोड करून लेखी स्वरुपात पुराव्याच्या छायांकित कागदपत्रासह उपस्थित रहावे.
विविध पदांच्या एकूण १० जागा
कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज स्वीकृती वेळ : सकाळी १०.३० ते ३.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!