औद्योगिक विकास बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६७६ जागा

औद्योगिक विकास बँक (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आयडीबीआय या बँकेने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ या पदासाठी भरती सूचना प्रसिद्ध केली आहे. देशभरात कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदाच्या ६७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी ऑनलाईन प्रक्रिया ८ मे पासून सुरू होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २० मे २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करायचा आहे. या पदांसाठी निवड उमेदवारांची ऑनलाईन चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यक्तिगत मुलाखत, भरती पूर्व वैद्यकीय चाचणी यातील गुणवत्तेआधारे होणार आहे. लेखी परीक्षा ८ जून २०२५ रोजी देशभरात होणार आहे. ही भरती एंट्री लेव्हल पदासाठी आहे. जॉईन होताना मोबदला ठरला आहे. ६ लाख १४ हजार ते ६ लाख ५० हजार रुपये दरवर्षी अ गटातील शहरात नियुक्ती झाल्यास मिळणार. एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी नंतर ओ ग्रेड दिल्या जाणार आहे. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी राहणार. त्यात सहा महिने स्टाईपेंड व दोन महिन्याचा इंटर्नशिप राहील.

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ६७६ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (JAM) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. सदरील पदासाठी सविस्तर जाहिरात बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. सामान्य, आर्थिक कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान ६० टक्के, एससी, एसटी उमेदवारांसाठी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संगणक प्राविण्य आवश्यक आहे.

अर्ज शुल्क –

    • इतर सर्व उमेदवार –  रु. 1050/-
    • SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});