बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
वैद्यकीय संक्रमण सल्लागार, कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष- कर्करोग, अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्णवेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, मानद हृदयरोग तज्ञ, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), परिचारीका, कनिष्ठ औषध निर्माता, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगरपालिका- CTC, PHO आणि BMT केंद्र, बोरिवली (पूर्व), मुंबई, पिनकोड- 400066
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!