अंबिका रिचार्ज सोल्युशन मध्ये कार्यालयीन प्रतिनिधी पदांच्या २० जागा
अंबिका रिचार्ज सोल्युशन प्राईव्हेट लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन प्रतिनिधी पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत.
कार्यालयीन प्रतिनिधी पदांच्या २० जागा
महिलांकरिता ऑफिस रेप्रेजेंटेटिव्ह पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – महिला उमेदवार SSC, HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असून अनुभवास प्राधान्य देण्यात येईल.
मासिक वेतन – विनाअनुभव किंवा कुठलाही अनुभव नसणाऱ्या उमेदवाराला रुपये 7000/- ते 12000/- आणि INBOUND किंवा OUTBOUND चा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला रुपये 12000/- ते 15000 वेतन देण्यात येईल. (नियम व अटी लागू)
नोकरीचे ठिकाण – कार्यालयाच्या ठिकाणी किंवा स्वतःच्या घरी बसून (Work From Home) करू शकता.
मुलाखतीची तारीख/ वेळ – दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा. ली., शिवशंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
त्वरित जॉइनिंग करण्यासाठी या 9067077677 / 9822507677 क्रमांकावर संपर्क साधावा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!