वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांच्या ५०९३ जागा
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER) यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या विविध आस्थापनेवरील परिचर्या (गट-क), तांत्रिक व अतांत्रिक सवांर्गातील विविध रिक्त असलेल्या पदांच्या एकूण ५०९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ५०९३ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ईसीजी तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट/ कॅटलॉगर/ प्रलेखाकार/ ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट/ व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका/ वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ/ ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ/ ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक/ जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक/ शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार/ सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल/ गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री/ बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि अधिपरिचारिका.पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – विविध पदांनुसार दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.