मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध पदांच्या एकूण १२ जागा
मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अनुवादक (Junior Translator) आणि दुभाष्या (Interpreter) पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१९ आहे.
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाष्या पदांच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ए.एल.एल.बी. किंवा समकक्ष कायद्याच्या पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.)
परीक्षा फीस – सर्वच प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फीस १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.