महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (गट-क) पदांच्या एकूण ९०० जागा
राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ९०० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ ही परीक्षा रविवार दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९०० जागा
उद्योक निरीक्षक (गट-क, उद्योग संचालनालय) पदांच्या १०३ जागा, दुय्यम निरीक्षक (गट-क, उत्पादन शुल्क) पदांच्या ११४ जागा, कर सहाय्यक (गट-क) पदांच्या ११७ जागा, लिपिक टंकलेखक (मराठी) गट-क पदांच्या ४७३ जागा, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट-क पदांच्या ७९ जागा आणि तांत्रिक सहायक (गट-क, विमा संचालनालय) पदांच्या १४ जागा अशा एकूण ९०० जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.