पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागात एकूण १२८ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता हंगामी विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्लड बँक टेक्निशिअन पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी./ डी.एम.एल.टी. उत्तीर्ण असावा.

ब्लड बँक कॉन्सिलर पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण असावा.

एमएसडब्ल्यू पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण असावा.

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्हताधारक असावा.

डायलेसिस टेक्निशिअन पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावीसह डायलेसिस कोर्स उत्तीर्ण असावा

फार्मासिस्ट पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह बी.फार्म/ डी.फार्म अर्हताधारक असावा.

एक्स-रे टेक्निशिअन पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह एक्स-रे टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण असावा.

स्टाफ नर्स (GNM) पदाच्या ९१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावीसह GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग) उत्तीर्ण असावा.

लॅब टेक्निशिअन पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावीसह डी.एम.एल.टी. उत्तीर्ण असावा.

कक्ष मदतनीस (पुरुष) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सातवी उत्तीर्ण आणि रुग्णालयीन कामाचा अनुभव असलेला असावा.

कक्ष मदतनीस (स्त्री) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सातवी उत्तीर्ण आणि रुग्णालयीन कामाचा अनुभव असलेला असावा.

नोकरीचे ठिकाण – पुणे (पिंपरी-चिंचवड)

परीक्षा फीस – नाही

मुलाखतीची तारीख – १३, १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ (सकाळी १० वाजता)

मुलाखतीचे ठिकाण – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉल, पिंपरी, पुणे.

टीप – मुलाखतीस येताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

सबंधित संकेतस्थळ

 

 

Comments are closed.