मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालयात कंत्राटी पदाच्या ४२ जागा
मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासाठी विविध पदाच्या एकूण ४२ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१९ आहे.
डेटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ३६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधारक आणि मराठी-३० श.प्र.मि. आणि इंग्रजी-४० श.प्र.मि. वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण व शासकीय नियमानुसार संगणक अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
परफ्युजनिस्ट पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.पी.एम.टी. परफ्युजनिस्ट अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
ऑडिओलॉजिस्ट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मास्टर इन ऑडिओलॉजी (एम.ए.) अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
सायकोलॉजिस्ट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मानसशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी (एम.ए.) अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
शिपाई पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठातांचे दालन, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई.
मुलाखतीची तारीख – २७ मार्च २०१९ आहे.
अर्ज दाखल करण्याचे ठिकाण – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष ज.जी.समूह रुग्णालय, मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.