महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत शिकाऊ पदांच्या एकूण १२५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या चंद्रपूर मंडल कार्यालयांतर्गत चंद्रपूर/ वरोरा/ बल्लारशा विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

चंद्रपूर विभागात विविध पदाच्या ५१ जागा
विजतंत्री पदाच्या २५ जागा, तारतंत्री पदाच्या १५ जागा आणि कोपा पदाच्या ११ जागा

वरोरा विभागात विविध पदाच्या ३६ जागा
विजतंत्री पदाच्या २० जागा, तारतंत्री पदाच्या १० जागा आणि कोपा पदाच्या ६ जागा

बल्लारशा विभागात विविध पदाच्या ३८ जागा
विजतंत्री पदाच्या २० जागा, तारतंत्री पदाच्या १० जागा आणि कोपा पदाच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावी उत्तीर्णसह आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री/ कोपा) पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्ष (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर, वरोरा आणि बल्लारशा विभाग

फीस – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८ ( सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});