इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०७ जागा

इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या पश्चिम विभागात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०७ जागा
(१) टेक्निशिअन अप्रेन्टिस, (२) ट्रेड अप्रेन्टिस, (3) ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट)

शैक्षणिक पात्रता – (१) उमेदवार ५०% गुणांसह मॅकेनिकल/ ऑटोमोबाइल/ इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ४५% गुण आवश्यक आहेत.) (२) उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (फिटर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट) उत्तीर्ण असावा. (३) उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ४५% गुण आवश्यक आहेत.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी 18 ते 24 वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा & नगर हवेली इत्यादी.

परीक्षा फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});