वसई-विरार महानगरपालिका मध्ये विविध (आरोग्य) पदांच्या १९८ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच , काही पदांकरिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९८ जागा
बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), मुंबई.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जुलै २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे. (बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)

मुलाखतीचा पत्ता –  वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.