पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६८ जागा
बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे, पिनकोड- ४११००५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!