सोलापूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ११० जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११० जागा
वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, टी.बी. आरोग्य अभ्यागत पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै ०२ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – आरोग्य मुख्य कार्यालय, प्रशासकीय इमारत, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

मुलाखतीची तारीख – दिनांक ०५ आणि ०६ ऑगस्ट २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नुमना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.