केंद्रीय कॅबिनेट सचिवालय मध्ये उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण ३८ जागा

भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाच्या आस्थापनेवरील उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

उपक्षेत्र अधिकारी पदांच्या ३८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४४,९००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५ वर्ष आहे.)

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पोस्ट बॅग क्र. 001, लोधी रस्ता, मुख्य पोस्ट कार्यालय, नवी दिल्ली, पिनकोड- 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.