पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी गेलेल्या तरुणांना वाहनाने चिरडले

व्यायामाला गेलेल्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघात शुक्रवारी (20 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास सोलापूर ते धुळे महामार्गावर रत्नापूर (ता.कळंब) शिवारात घडला. दोन्ही तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दौलत फुलचंद शिलवंत (वय-27, रा.रत्नापूर) व हृतिक चंदू चव्हाण (14) हे दोघे शुक्रवारी पहाटे पोलिस भरतीच्या तयारीच्या अनुशंगाने महामार्गावर व्यायामासाठी गेले हाेते. यावेळी अज्ञात वाहनाने या दोघांनाही जोराची धडक दिली. व्यायामासाठी गेलेल्या इतर तरुणांना अपघाताबाबत समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देऊन नातेवाईकांना कळवले. या अपघातात दौलत शिलवंत याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी हृतिक चव्हाण याला उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा

 

Comments are closed.

Visitor Hit Counter