केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा-२० जाहीर

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागात अंतर्गत विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०२१ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)-२०२१
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये २६ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये १७० जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रववर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.