स्वच्छता कामगाराचा मुलगा जिद्दीने लढाई जिंकून न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा घोषित झाला असून दिवाणी न्यायधीश स्तर (क) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी अॅड. कुणाल वाघमारे यांचा राज्यात दहावा क्रमांक आला आहे. कुणाल यांनी २०० पैकी १५८ गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांकावर येण्याचा मान पटकवला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गात कुणाल यांचा पहिला क्रमांक आल्यानं सोलापुरात आनंदाचं वातावरण आहे. अॅड कुणाल वाघमारे यांची दिवाणी न्यायाधीश (क) स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल सोलापूरसह राज्यभरातून कौतुकाचा वर्षावर होत आहे.

अधिक वाचा

 

Comments are closed.

Visitor Hit Counter