महाविद्यालयांतील रिक्त जागा भरण्यासाठी दहा नोव्हेंबरची अंतिम मुदत 

विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील रिक्त जागांवरील रखडलेली भरती हा चिंतेचा विषय आहे. शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी ही भरती करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आहेत, तरीही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आयोगाला चौथ्यांदा याबाबत स्मरणपत्र काढावे लागले आहे. तसेच, भरती पूर्ण करण्यासाठी दहा नोव्हेंबरची अंतिम मुदतही दिली आहे.

अध्यापकांच्या अपुऱ्या संख्येमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे कारण देत आयोगाने जूनपासून भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देशातील विद्यापीठांना दिल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरतीदेखील अपेक्षित होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सांगितले होते. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter