Posts Tagged ‘Mega bharti’

महाराष्ट्र शासनाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ४०५ जागा
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय/ खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी ७ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 


आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब या संवर्गातील पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब पदाच्या २८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता (मूळ जाहिरात) धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष आणि मागासवर्गीय/ खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्ष तसेच अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना १५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१८ पासून आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ११:३० पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

 

     
Visitor Hit Counter