सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या २६३ जागा

 

महराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या २६३ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी मधील तीन वर्षाची पदविका (डिप्लोमा) किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारानां ५ वर्षे सवलत राहील तर अपंग आणि खेळाडू उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत राहील.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गासाठी ४५०/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी २५०/- रुपये राहील.

प्रवेशपत्र – ९ जून २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – २३ किंवा २४ जून २०१८ रोजी ऑनलाईन घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मे २०१८ (रात्री १२:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत.
You might also like
.
Comments
Loading...