केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -२०१८ जाहीर

भारत सरकारच्या संरक्षण विभागातील विविध पदाच्या एकूण ४१४ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)- २०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

परीक्षा – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)- २०१८

संरक्षण विभागातील विविध पदाच्या एकूण ४१४ जागा

भारतीय सेना (लष्करी) अकादमी (डेहराडून) मध्ये १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1995 ते 01 जुलै 2000 दरम्यान झालेला असावा.

भारतीय नौदल अकादमी मध्ये ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1995 ते 1 जुलै 2000 दरम्यान झालेला असावा.

हवाई दल अकादमी (हैदराबाद) मध्ये ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1995 ते 1 जुलै 1999 दरम्यान झालेला असावा.

अधिकारी प्रशिक्षण अकादमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान झालेला असावा.

अधिकारी प्रशिक्षण अकादमी (महिला) चेन्नई मध्ये १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – 200/- रुपये अनुसूचित जाती-जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये सवलत.

परीक्षा – 18 नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2018 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.co.in टाईप करून शोधा / बुकमार्क करा …

 

 

You might also like
Comments
Loading...