महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळात अभियंता पदाच्या एकूण २० जागा
महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील अभियंता पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यकारी अभियंता पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – बांधकाम अभियांत्रिकी पदवी किंवा वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवीसह 7 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१८ रोजी २१ ते ३८ दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)
उप अभियंता पदाच्या एकूण १२ जागा
शैक्षणिक पात्रता – बांधकाम अभियांत्रिकी पदवी (५५% गुणांसह) आणि ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१८ रोजी २१ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्यात कुठेही असेल.
परीक्षा फीस – खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK वेबसाईट व इंटरनेट वापरकर्त्यांना अत्यंत महत्वाची विनम्र सूचना
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २७ जागा