इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर तांत्रिक पदाच्या ४० जागा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता आणि अनुभव धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियांत्रिकी/ तांत्रिक सहाय्यक (उत्पादन) पदाच्या २७ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह केमिकल / रिफायनरी & पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेद्वारानं गुणांमध्ये ५% सवलत.)

कनिष्ठ अभियांत्रिकी/ तांत्रिक सहाय्यक (P&UO&M) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा आणि एक वर्षाचा वर्ष अनुभव आवश्यक. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेद्वारानं गुणांमध्ये ५% सवलत.)

कनिष्ठ अभियांत्रिकी/ तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी डिप्लोमा आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेद्वारानं गुणांमध्ये ५% सवलत.)

कनिष्ठ अभियांत्रिकी/ तांत्रिक सहाय्यक (इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन & नियंत्रण अभियांत्रिकी डिप्लोमा आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेद्वारानं गुणांमध्ये ५% सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १५०/- रुपये तर अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्ण सवलत.

परीक्षा – ९ सप्टेंबर २०१८ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.co.in टाईप करून सर्च  किंवा बुकमार्क करा …

You might also like
.
Comments
Loading...