महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २७ जागा

महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाच्या नियंत्रणा खालील भाडे नियंत्रण कायदा न्यालयाय, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० (श.प्र.मि.) आणि इंग्रजी टंकलेखन ४० (श.प्र.मि.) व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व्यावसायिक परीक्षा व MS-CIT उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत.)

लिपिक टंकलेखक पदाच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि
मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत.)

प्रोसेस सर्व्हर पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत.)

शिपाई पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एस.एस.सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300/- रुपये तर राखीव प्रवर्गातिक उमेदवारांसाठी 150/- रुपये आहे.

प्रवेशपत्र -14 सप्टेंबर 2018 पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – 22 किंवा 23 सप्टेंबर २०१८ रोजी (CBT) घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

NMK वेबसाईट व इंटरनेट वापरकर्त्यांना अत्यंत महत्वाची विनम्र सूचना

संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेत एकूण ४९४ जागा (मुदतवाढ)

You might also like
Comments
Loading...