भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या ३९४ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र तारापूर/ मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदाच्या एकूण ३९४ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी तांत्रिक (वर्ग-१) पदाच्या ८६ जागा
मेकॅनिकल १७ जागा, इलेक्ट्रिकल ६ जागा, मेटलर्जी ५ जागा, केमिकल १५ जागा, सिव्हिल १ जागा, कॉम्पुटर सायन्स ५ जागा, इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन ५ जागा, केमिस्ट्री १४ जागा आणि फिजिक्स १८ जागा

प्रशिक्षणार्थी तांत्रिक (वर्ग-२) पदाच्या २०६ जागा
प्लांट ऑपरेटर ६२ जागा, लॅब ३८ जागा, एसी मेकॅनिक १३ जागा, फिटर ३६ जागा, वेल्डर ७ जागा, मशिनिस्ट ७ जागा, इलेक्ट्रिकल २३ जागा, इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन १९ जागा आणि मेकॅनिकल पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा/ ६०% गुणांसह बीएस्सी (केमिस्ट्री/फिजिक्स)/ ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (पीसीएम)/ ६०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – २० ऑगस्ट २०१८ रोजी उमेदवाराचे वय वर्ग-१ साठी १९ ते २४ वर्षे तर वर्ग-२ साठी १८ ते २२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – वर्ग-१ साठी १५०/- रुपये तर वर्ग-२ साठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ अल्पसंख्यांक/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अभियंता पदाच्या १४७ जागा

कोकण रेल्वेच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या एकूण १०० जागा

.
You might also like
.
Comments
Loading...