कोल्हापूर येथे डिसेंबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

NMK Recruitment 2018- Indian army open rally in kolhapur

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ६ डिसेंबर २०१८ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान कोल्हापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांबरोबरच उत्तरदक्षिण गोव्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोल्जर जनरल ड्यूटी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/ दारुगोळा निरीक्षक) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ संगणक ज्ञान/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/ व्हेटर्नरी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर (ट्रेड्समन) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार आठवी/ दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६२ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

हवलदार (सर्वेक्षक स्वयंचलित कार्टोग्राफर) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीए/ बी.एस्सी. किंवा बारावी १२ वी (पीसीएम) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० वर्ष ते २५ वर्षे दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांची उंची १७० सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

धार्मिक शिक्षक (RT-JCO) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – संकेतस्थळावर दिलेल्या तपशिलात वाचावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्ष ते ३४ वर्षे दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांची उंची १६० सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

मेळाव्याचे ठिकाण – पोलीस स्पोर्ट ग्राउंड, कोल्हापूर.

कालावधी – ६ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान आहे.

प्रवेशपत्र – २१ नोव्हेंबर २०१८ ते ५ डिसेंबर २०१८ दरम्यान उपलब्ध होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

You might also like
Comments
Loading...