महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदाच्या ६५ जागा

MSRTC Recruitment 2019 : Various Vacancies for the 65 Posts

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंत्र अभियंता पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी व एमबीए किंवा समतुल्य अर्हता आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

विभागीय वाहतूक अधिकारी पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

उप यंत्रअभियंता पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

लेखा अधिकारी/ लेखापरीक्षण अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

भांडार अधिकारी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मटेरियल अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी /एमबीए/ आयसीडब्ल्यूए आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

विभागीय वाहतूक अधीक्षक पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

सहाय्यक यंत्र अभियंता (यांत्रिकी) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

सहायक/ विभागीय लेखा अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

विभागीय सांख्यिकी अधिकारी पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी. (Statistics) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचनाकाराने आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.

You might also like
.
Comments
Loading...