बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा (मुदतवाढ)

MCGM Recruitment 2018 : Engineer Vacancies for the 291 Posts

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील दुय्यम अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी व विद्युत/ वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

दुय्यम अभियंता (यांत्रिकी-विद्युत) पदाच्या ९२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी किंवा असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा/ महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.(मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचनकाराने आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...