आयबीपीएस मार्फत विविध बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या ७२७५ जागा

आयबीपीएस मार्फत देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७२७५ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आठव्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक (क्लार्क) पदाच्या एकूण ७२७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुला आणि इतर मागासवर्गीयांसाठी ६००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये राहील.

पूर्व परीक्षा – नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात येईल.

मुख्य परीक्षा – २० जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० आक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहीरात डाऊनलोड करा

संबंधित वेबसाईट लिंक

 

You might also like
Comments
Loading...