भारतीय विमानतळ प्राधिकरणात व्यवस्थापक/ कार्यकारी पदांच्या 908 जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील मॅनेजर आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव पदांच्या एकूण 908 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक (मॅनेजर) एकूण 492 जागा
फायनान्स १८ जागा, फायर सर्व्हिसेस १६ जागा, टेक्निकल १ जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ५२ जागा, सिव्हिल इंजिनिअरिंग ७१ जागा, अधिकृत भाषा ३ जागा, कमर्शियल ६ जागा, मानव संसाधन ५ जागा, इलेक्ट्रॉनिक्स ३२४ जागा.
पात्रता – बी.ई./ बी.टेक/ एमबीए/ पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 जून 2018 रोजी 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.)

कनिष्ठ कार्यकारी (ज्यु.एक्झिक्युटिव) पदाच्या 412 जागा
एअर ट्रॅफिक कंट्रोल २०० जागा, फायनान्स २५ जागा, फायर सर्व्हिसेस १५ जागा, एअरपोर्ट ऑपरेशन्स ६९ जागा, टेक्निकल १० जागा, प्राधिकृत भाषा ६ जागा, आयटी २७ जागा, कॉर्पोरेट प्लॅनिंग आणि व्यवस्थापन सेवा ३ जागा, मानव संसाधन ३२ जागा, व्यावसायिक २५ जागा.
पात्रता – बीएस्सी (गणित आणि भौतिकशास्त्र) किंवा बी.ई./ बी.टेक आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 जून 2018 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०००/- रुपये (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग उमेदवारांना फीस नाही.)

परीक्षा – 11 ते 14 सप्टेंबर २०१८ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची तारीख – 16 जुलै २०१८ पासून १६ ऑगस्ट २०१८ पर्यंत आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत.
You might also like
Comments
Loading...