राजस्थान लोकसेवा आयोगामार्फत पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९०० जागा

राजस्थान लोकसेवा आयोग यांच्या मार्फत पशुपालन विभागाच्या आस्थापनेवरील पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयात बॅचलर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – अनारक्षित प्रवर्गाकरिता ३५०/- रुपये तर आरक्षित प्रवर्गाकरिता २५०/- रुपये  तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.