खासगी शाळांमधील शिक्षक भरती आता डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता

राज्यात 12 हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामधील पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांना आणखी एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेले उमेदवार विविध प्रकारची माहिती विचारण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयात धाव घेऊ लागले आहेत. शिक्षक भरतीबाबतच्या सर्व सूचना व वेळापत्रक पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी विनाकारण शिक्षण आयुक्त कार्यालयात गर्दी करू नये, अशा सूचना अधिकार्‍यांकडून उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. (संपूर्ण जाहिरात वाचा)

 


Comments are closed.