रत्नागिरी येथे नोव्हेंबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १७ ते २७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रत्नागिरी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सूचना – रत्नागिरी येथील रॅलीमध्ये पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना अनुक्रमे सोल्जर फार्मा, सोल्जर टेक्निकल/ सोल्जर नर्सिंग आणि सैनिक लिपिक / स्टोअर क्लार्क आणि टेक्निकल (एव्हिएशन/ दारुगोळा निरीक्षक) पदांकरिता भरती होण्यासाठी सहभागी होता येईल.

सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/ दारुगोळा निरीक्षक) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ संगणक ज्ञान/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/ व्हेटर्नरी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (एसकेटी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६२ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन (दहावी उत्तीर्ण) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता आठवी/ दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन (आठवी उत्तीर्ण) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांची उंची १७० सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (AMC) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (PCB & English)किंवा ५५% गुणांसह डी. फार्मसी किंवा ५०% गुणांसह बी.फार्मसी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांची उंची १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

मेळाव्याचे ठिकाण – शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, रत्नागिरी (महाराष्ट्र)

कालावधी – दिनांक १७ ते २७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान आहे.

प्रवेशपत्र – दिनांक २ ते १६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान उपलब्ध होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.