केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध अभियांत्रिकी पदांच्या एकूण ४९५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी पदांच्या एकूण ४९५ जागा भरण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या संयुक्त अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियांत्रिकी पदांच्या एकूण ४९५ जागा
सिव्हिल अभियांत्रिकी (वर्ग-१), यांत्रिकी अभियांत्रिकी (वर्ग-२), विद्युत अभियांत्रिकी (वर्ग-३) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (वर्ग-४) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी २००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – दिनांक ५ जानेवारी २०२० रोजी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.