केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या एकूण ९८६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण ९८६ जागा भरण्यासाठी २ जून २०१९ रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०१९ आणि भारतीय वन सेवा परीक्षा- २०१९ या परीक्षा आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नागरी सेवा परीक्षा (CSP): ८९६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.

भारतीय वन सेवा परीक्षा (IFS): ९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी१००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ महिला उमेदवारांना फीस पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – २ जून २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

नागरी सेवा परीक्षा जाहिरात

वन सेवा परीक्षा जाहिरात 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter