युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अग्निशमन अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई. (अग्निशमन अभियांत्रिकी)/ विभागीय अधिकारी कोर्स आणि १० वर्ष अनुभव आवशयक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० ते ४० वर्ष दरम्यान असावे.

अर्थशास्त्रज्ञ पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवीसह ३ वर्ष अनुभव धारक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २४ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण १९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभव आवशयक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

एकीकृत ट्रेझरी अधिकारी पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.ए./ पी.जी.डी.एम.(Finance/Accounting/ International Business/ Trade Finance)/ सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएफए/ एफआरएम/ एम.ए.(अर्थशास्त्र)/ एम.एस.(अर्थशास्त्र)/ एमएफसी अर्हता धारक आणि ५ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ ते ३२ वर्ष दरम्यान असावे.

क्रेडिट अधिकारी पदाच्या एकूण १२२ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम (फायनान्स)/ सी.ए./ सीडब्ल्यूए/ सीएफए/ एफआरएम अर्हता धारक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ ते ३२ वर्ष दरम्यान असावे.

चलन अधिकारी पदाच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीपीएम/ पीजीडीबीएम (Finance/ International Business/ Trade Finance) अर्हता धारक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ ते ३२ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवार्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter