महापरीक्षा : तलाठी पदाच्या परीक्षेतील घोळाचा लाखो उमेदवारांना बसला फटका

महाराष्ट्र शासनाने अट्टहासाने संगणकीय परीक्षा घेण्याच्या नादात २४ दिवस दोन सत्रात चाललेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत ई-महापरीक्षा या सरकारी कंपनीकडून प्रश्न चुकविले. त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी उमेदवारांना प्रत्येकी दोन गुण बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाच लाखांहून अधिक परीक्षार्थी उमेदवाराचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

या पदासाठी ४८ प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. एका प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण अशी रचना होती. प्रत्येक सत्रासाठी नवी प्रश्नपत्रिका काढण्यात येत असल्याने काठिण्यपातळीवर उमेदवाराचे आक्षेप आहेत. त्यातच चुकलेल्या प्रश्नांना गुण देण्याच्या निर्णयामुळे लायक उमेदवार निवड यादीत मागे फेकले जाणार आहेत.

(संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter