भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १९३७ जागा

भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १९३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैदयकिय सेवेतील विविध पदाच्या १९३७ जागा
स्टाफ नर्स पदाच्या ११०९ जागा, आरोग्य निरीक्षक (मलेरिया) पदाच्या २८९ जागा, औषध निर्माता (ग्रेड-III) पदाच्या २७७ जागा, रेडिओग्राफर पदाच्या एकूण ६१ जागा, प्रायोगशाळा तंत्रज्ञ (ग्रेड-II) पदाच्या ८२ जागा आणि इतर विविध पदांच्या एकूण ११९ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० किंवा १८ ते ३५ किंवा १८ ते ३३ किंवा १९ ते ३३ किंवा २० ते ३३ किंवा २० ते ३५ किंवा २० ते ४० किंवा २१ ते ४० किंवा २२ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती/ आर्थिक दृष्ट्या मागास (ESBC)/ /तृतीयपंथी/ अल्पसंख्याक/ अपंग/ महिला/माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

परीक्षा – जून २०१९ मध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाइन अर्ज करा

 

 

Comments are closed.