नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये तांत्रिक पदाच्या १०७ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदविका (शिकाऊ) पदाच्या एकूण ५५ जागा
इलेक्ट्रिकल पदविका १५ जागा, यांत्रिक पदविका २८ जागा, नियंत्रण व इंस्ट्रुमेंटेशन पदविका १० जागा आणि बांधकाम पदविका २ जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवार ७०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारण केलेला असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवारांसाठी पास श्रेणी आवश्यक आहे.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २४ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

आयटीआय (शिकाऊ) पदाच्या एकूण ४२ जागा
फिटर ट्रेड २२ जागा, इलेक्ट्रिशिअन १२ जागा आणि इंस्ट्रूमेंट मेकॅनिक ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (फिटर/ इलेक्ट्रिशिअन/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २४ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. (केमिस्ट्री)/ इंडस्ट्रियल/ अप्लाइड केमिस्ट्री पदवी) उत्तीर्ण असावा.

सहाय्यक मटेरियल/ स्टोअर कीपर पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एनसीटीव्हीटी (स्टोअर कीपिंग) प्रमाणपत्र तसेच इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (फिटर/ इलेक्ट्रिशिअन/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक) अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – ओडिसा

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी फीस पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – डिसेंबर २०१८ आणि जानेवारी २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.