नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलात विविध पदाच्या २६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विभागीय अग्निशमन अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अग्निशमन अभियांत्रिकी पदवी/ पदविका किंवा समतुल्य आणि MS-सिट आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

अग्निशमन केंद्र अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर पदविका किंवा समतुल्य, MS-CIT आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

अग्निशमन प्रणेता पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह अग्निशामक कोर्स, MS-CIT आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

अग्निशामक पदाच्या एकूण २०८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

वाहनचालक (अग्निशमन) पदाच्या ३९ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा आणि जड वाहन चालविण्याचा परवान्यासह ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२५/- आहे.

प्रवेशपत्र – ५ ऑक्टोबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – १३ ते १६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter