राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या एकूण ५७१६ जागा

महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा
अमरावती ४५५ जागा, यवतमाळ ४०२ जागा, सिंधुदुर्ग २०१ जागा, ठाणे १४५ जागा, रायगड २०२ जागा, सातारा ३१७ जागा, पुणे ५०३ जागा, जळगाव ३२२ जागा, अहमदनगर ४४५ जागा, नाशिक ४२९ जागा, नंदुरबार ११७ जागा, लातूर १६८ जागा, नांदेड १९६ जागा, उस्मानाबाद १०७ जागा, नागपूर ३१९ जागा, भंडारा ८९ जागा, पालघर २३८ जागा, गोंदिया १६८ जागा, चंद्रपूर २२५ जागा, वर्धा ८५ जागा, गडचिरोली २६३ जागा आणि सांगली ३२० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार युनानी मेडिसिन पदवी/ आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक २१ जुलै २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप संचालक, आरोग्य सेवा (संबंधित जिल्हा)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – १ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.