पोस्टाच्या भरतीचे वाजले तीन तेरा; उमेदवारांचा जीव आला मेटाकुटीला

शासनाने पोस्टाच्या 3650 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली असून त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र अनेक अडचणींमुळे ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय सर्व्हरच्या अडचणीमुळे अर्ज भरणे शक्‍य होत नसल्याने नोकरी इच्छुक तरुण धास्तावले असून या भरतीचे तीनतेरा वाजले आहेत.

केंद्र शासनाच्या सेवेचा भाग असलेली पोस्टाची 3650 जागांसाठीच्या भरतीची प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाली होती. संपूर्ण देशभर वेगवेगळ्या 23 सर्कलमधून भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरती प्रक्रियेसंदर्भात सदर जाहिरातीत उल्लेख करण्यात आला. यामध्ये शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर व डाकसेवक या तीन पदांच्यासाठी सदर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

(संपूर्ण बातमी वाचा)

 


Leave A Reply

Visitor Hit Counter