रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर मिळणार रिफंड

प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. अधिकृत रेल्वे एजंटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसी ओटीपी आधारित प्रणाली आणली आहे.

प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) ही सुविधा केवळ अधिकृत एजेंटच्या माध्यमातून बूक करण्यात येणाऱ्या ई-तिकीटांवर लागू असणार असल्याची माहिती दिली आहे. ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे. त्याचबरोबर यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार आहे. (सौजन्य : लोकमत)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter