नवीन आमदारांचा जल्लोष, चौथ्यांदा जिंकणारे बच्चू कडू मात्र दिव्यांगांत व्यस्त

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जागोजागी विजयाचा जल्लोष साजरा केला. याला अपवाद ठरले ते म्हणजे सलग चौथ्यांदा जिंकणारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू.

25 ऑक्टोबरची पहाट दिवाळीचा पहिला दिवस.  बच्चू कडू यांचे हजारो समर्थक विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. सर्वत्र एकच आनंदमय वातावरण असताना बच्चू कडूंची धावपळ मात्र वेगळीच चालू होती..! बच्चू कडूंनी सर्वांना एकच विनंती केली. ‘थोडे थांबा, मला तत्पूर्वी माझ्या मित्रांची आंघोळ घालून येवू द्या’.. असे बोलून बच्चू कडू ‘पूर्णामाय अपंग व अनाथ पुनर्वसन’ केंद्रावर दाखल झाले. दरवर्षी दिवाळीची सुरुवात बच्चू कडू येथूनच करतात. येथील सर्व अनाथ अपंग मुलं-मुलींना स्वतःच्या हाताने उटणे लावून अभ्यंगस्नान घालतात . नवे कपडे, मिठाई व फटाके फोडून काही वेळ त्यांच्यासोबत घालवून सर्वांना शुभेच्छा देतात. (सौजन्य: लोकसत्ता)


Comments are closed.

Visitor Hit Counter