कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय संचालकाकडून अखेर रद्द

राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध प्रकल्प असलेल्या गोकुळच्या बहुराज्य संस्था नोंदणीचा प्रस्ताव सत्तारूढ गटाने स्वतःहून गुंडाळला आहे. या विरोधात जोरदार जनमत उभे राहिल्याने संचालक मंडळावर ही वेळ आली आहे. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी आज एक पत्रक काढुन सभासदांच्या भावना लक्षात घेऊन सेंट्रल रजिस्ट्रारकडे नोंदणीसाठी पाठवलेला बहुराज्यचा (मल्टिस्टेट) प्रस्ताव सध्या रद्द करण्यात येत आहे, असे पत्रक प्रसिद्ध केले आहे. या निर्णयाचे स्वागत गोकुळ विरोधात संघर्ष करणारे आमदार सतेज पाटील यांनी केले असून गोकुळ विरोधातील अपप्रवृत्ती, गैरव्यवहार याच्याविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या दोन वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter